'प्रभू श्री राम भारतीय नव्हते, तर ते नेपाळी होते' - के.पी.शर्मा

भारतातील अयोध्या बनावट, खरी अयोध्या ही नेपाळमध्ये, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा दावा

काठमांडू । राजकीय संकटात सापडल्यामुळे आपली खुर्ची जाण्याची भिती असलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतावर निशाना साधला आहे. प्रभू श्री राम हे भारताचे नसुन ते नेपाळचे होते. भारताने सांस्कृतीक अतिक्रमण करुन बनावट अयोध्या ही भारतात निर्माण केली आहे. असा दावा ओली यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओली हे मोठ्या अडचणीत सापडले आहे. आपले पद वाचावे यासाठी ते कित्येक दिवसांपासून सातत्याने भारतविरोधी भुमिका करीत आहे.

ओली यांनी केलेल्या दाव्यामुळे अयोध्याचे संत संतप्त झाले आहेत. रामदल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास महाराज म्हणाले की, आजपासून नेपाळमधील त्यांचे शिष्य ओलीच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना एका महिन्यातच सत्तेतून बाहेर काढू. माझे शिष्य ओलींच्या विरोधात प्रदर्शन करतील व त्यांना सत्तेतून बाहेर काढतील.AM News Developed by Kalavati Technologies