ऑस्ट्रेलियाने उडवला भारताचा धुव्वा, एकही गडा न गमवता गाठले लक्ष

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 37.4 षटकांत लक्ष्य गाठले.

स्पोर्ट्स डेस्क ।  मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताने 10 गडी राखून पराभूत करून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली आणि 49.1 षटकांत 255 धावांवर बाद झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष मिळाले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 37.4 षटकांत लक्ष्य गाठले.

डेव्हिड वॉर्नर 128 आणि कर्णधार अ‍ॅरोन फिंच 110 धावांवर नाबाद राहिले. पाठलाग करून भारताविरुद्धची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम या दोघांनी केला. यापूर्वी 1997 मध्ये वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉल आणि स्टुअर्ट विल्यम्स यांनी नाबाद 200 धावांची भागीदारी केली होती. फिंचने 16 वे आणि वॉर्नरने 18 वे शतक ठोकले. दोघांनी सलग पाचव्या वेळी भारताविरुद्ध 50+ धावांची भागीदारी केली. यापूर्वी पाकिस्तानचे सईद अन्वर आणि आमिर सोहेल यांनी 1994 ते 1996 दरम्यान 6 वेळा हे काम केले होते.AM News Developed by Kalavati Technologies