पैठण | शिवशाही बसने संत एकनाथांची पालखी पंढरपूरला रवाना

पालखी सोबत फक्त 20 वारकरी, महसुल अधिकारी, व पोलीस यांचा समावेश आहे.

पैठण | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भानुदास एकनाथांचा जयघोष करत पैठण येथील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची पादुका पालखी मोजक्या वारकऱ्यांसह भक्तीमय वातावरणात शिवशाही बसने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाली. नाथांच्या पालखीची 421 वर्षाची पंरपरा आहे. 

पालखी सोबत फक्त 20 वारकरी, महसुल अधिकारी, व पोलीस यांचा समावेश आहे. पालखी पैठण ते पंढरपूर मार्गावर कुठे थांबवण्यात येऊ नये असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने पालखी सायंकाळ पर्यंत पंढरपूरला पोहचणार आहे. पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदीरात नाथांची पालखी गेली 18 दिवसापासून मुक्कामी आहे.

सकाळी राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पालखी प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांच्या हस्ते आरती करुन नाथांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. उपस्थित मोजक्या वारकऱ्यांनी सातपावली खेळत मोठ्या उत्साहात पालखीला पंढरपूरला वाटी लावले. राज्यासह संपूर्ण देश कोरोना मुक्त होवो अशी प्रार्थना विठ्ठलाकडे करणार असल्याच्या भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केल्या. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके हे उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies