औरंगाबादकरांनो सावधान 'तो' मॅसेज चुकीचा, फॉरवर्ड कराल तर होईल कारवाई

एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्यानं वाढत चालला आहे. आज सकाळी जिल्ह्यात 208 कोरोनाबाधितांची नोंद झाली असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 988 जाऊन ठेपलीय. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनासमोरच्या अडचणीत वाढ होतांना दिवसत आहे. दरम्यान एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे.

"औरंगाबाद जिल्हा तिसऱ्या स्टेजला पोहचेल आपण सर्वांनी काळजी घ्यायची असून जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत". असा मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. अशा कोणत्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नसून हा फेक मॅसेज असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं कुणीही हा मॅसेज फॉरवर्ड करु नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies