औरंगाबादेत कोरोना बाधितांचा आकडा वाढला, सकाळपासुन 40 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 3140 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 40 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 25 पुरूष, 15 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6681 कोरोनाबाधित आढळले असून 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 964 स्वँबपैकी आज 168 अहवाल सकारात्मक (Positive ) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (35)

रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), अल्पाइन हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा (2), मथुरा नगर (1), विष्णू नगर (1), चिकलठाणा (1), नुपूर सिनेमा परिसर, सिडको (2), मयूर पार्क (5), एन दोन सिडको (4), हर्सूल, पिसादेवी (1), दशमेश नगर (1), वेदांत नगर (1), जय भवानी नगर (2), प्राइड रेसिडन्सी (1), टीव्ही सेंटर (1), शास्त्री नगर (2), अशोक नगर, सिंधी बन (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (5)

आयोध्या नगर, बजाज नगर (1), क्रांती नगर, बजाज नगर (2), अंधानेर, कन्नड (1), रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.AM News Developed by Kalavati Technologies