औरंगाबाद | हर्सुल तलावात बुडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

हर्सुल तलावात एका 19 वर्षीय युवकाच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद | हर्सुल तलावात बुडुन अंदाजे वय 19 असलेल्या युवकाचा मृत्यू झाला असल्याची घटना उशिरा रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे. प्रदुम ईश्वर वरकड, राहणार सारा वैभव सोसायटी, जटवाडा रोड, औरंगाबाद असे या युवकाचे नाव आहे. कशासाठी हा युवक रात्रीच्या वेळी तलावाकडे गेला होता हे पोलीस चौकशीत समोर येईल. दरम्यान या  घटनेची माहिती मिळताच अग्णिशामन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढून हर्सुल पोलीसांच्या स्वाधीन केला आहे.

अशी माहिती मनपाच्या अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दरम्यान पावसाळा असल्यानं हर्सुल तलाव तुडुंब भरलेला आहे, सायंकाळी तलावाजवळ अनेक जण फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे मनपा प्रशासनाने येथे 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्याची गरज आहे.AM News Developed by Kalavati Technologies