सिल्लोडमध्ये तिरंगी राख्या बांधत देशभक्ती जोपासण्याचा प्रयत्न

सिल्लोडमध्ये तिरंगी राख्या बांधत देशभक्ती जोपासण्याचा प्रयत्न

सिल्लोड | तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी व महिला शिक्षिकानी पुढाकार घेत स्वतः च्या हाताने तयार केलेल्या राख्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना बांधत अनोख्या पद्धतीने देशभक्तीजागवण्याचा प्रयत्न करणार आहे.

कार्यानुभव विषयाचे प्रात्यक्षीक म्हणुन विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्या आहेत. 15 ऑगष्ट रोजी स्वतंत्रदिनी रक्षाबंधन असुन या विद्यार्थिनी 14 ऑगस्टला विद्यालयासमोरील कन्नड-सिल्लोड रस्त्यावर थांबून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी-पदाधिकारी, बसचे चालक-वाहक, विद्युत मंडळाचे कर्मचारी, महसुल खात्याचे कर्मचारी, पशूसवर्ध खाते, वनखाते, संरक्षण खात्यातिल सैनिक जवान बंधु, पोलिस खात्यातील अधिकारी कर्मचारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक बंधु, वनखात्यातील कर्मचारी, कृषि खात्यातील कर्मचारी, शेतकरी बंधू, पत्रकार बंधू, सहकार विभागातिल कर्मचारी, एकात्मिक बालविकास, ग्रामपंचायत कर्मचारी न्यायालयिन व्यवस्थेतील कर्मचारी, साहित्यिक, कलाकार, मजुरबंधू यांसह राजकिय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना राख्या बांधत औक्षण करुन सन्मानित करणार आहेत. परंपरेने आलेल्या या सणाचे औचित्य साधत पवित्र मानल्या जाणार्या या बहिण-भावाच्या सणाला तिरंगी राख्या बांधत देशभक्ती, राष्ट्रप्रेम जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे विद्यार्थिनींनी सांगीतले.AM News Developed by Kalavati Technologies