मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने, लातूरात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने चाकूर तालुक्यातील बोरगाव(बु) येथील तरूणाने औषध प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

लातूर । चाकूर तालुक्यातील बोरगाव (बु) येथील किशोर कदम (वय 25) या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने; तहसील परिसरात आत्महत्या करणार असल्याचा इशारा एक चिट्टी लिहुन व स्वत:चा व्हिडिओ तयार करून दिला होता. त्याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने चाकूर तहसीलच्या प्रांगणात औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला तहसील येथील कर्मचाऱ्यांनी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व प्रकृती चिंताजनक असल्याने, पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलवण्यात आले आहे.

काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिली असल्याने, व्यथीत होऊन आत्महत्या करीत आहे व माझी आरक्षणाची लढाई आणि नौकरी मिळण्याची मेहनत वाया गेली आहे. मी आठ वेळा फॉर्म भरले आहेत तरीही मला नौकरी लागली नाही. माझ्या समाजाचे व माझे जिवन अहंकारमय झाले आहे. त्यामुळे मी तहसीलसमोर आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय घेत आहे अशी किशोर कदम यांनी चिट्टी लिहली व व्हिडिओ केला होता. आणी आज तहसील कार्यालयासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न किशोरने केला.AM News Developed by Kalavati Technologies