आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन-पाकिस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर-ओवैसी एक होतात

सीएए व एनआरसी कायदया समर्थनार्थ म्हसळ्यामध्ये नागरिकांची "तोबा" गर्दी

म्हसळा (निकेश कोकचा) । केंद्राने काश्मीर बाबत आणलेले ३७० व ३५ अ, सुप्रीम कोर्टने ४८५ वर्ष प्रलंबीत असणारा राम मंदीर, तीन तलाक या बाबतीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे विरोधकांच्या अस्तीत्वावर प्रश्न चिन्ह मिर्माण करणारे ठरले. यामुळे अंतरराष्ट्रीय पातळीवर चीन-पाकिस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर-ओवैसी एक होतात. त्यांना काही अन्य मंडळी खतपाणी घालत असल्याचे म्हणत, या विरोधात हिंदूनी एकवटणे गरजेचे आसल्याचे मत सीएए व एनआरसी चे तज्ञ मार्गदर्शक उमेश गायकवाड यांनी मांडले.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी म्हसळा शहरात हिंदू संघटनेतर्फ आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू संघटनेच्या वतीने विशाल जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी सीएए व एनआरसी कायदया समर्थनाथ म्हसळ्यामध्ये नागरिकांची "तोबा" गर्दी होती.

केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चे कऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही हे दोन कायदे भारतीय संसदेने लोकसभा व राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. या दोन्ही कायद्यांना समर्थनासाठी गुरुवारी सकाळी ११वा.एस.टी. स्टँड म्हसळा ते बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर समर्थन रॅली, तहसीलदार यांना सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. नंतर म्हसळा ग्रामदेवता श्री धावीर देव पटांगणात आयोजकांमार्फत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे CAA व NRC चे तज्ञ मार्गदर्शक उमेश गायकवाड, भाजपाचे जिल्हा अध्यक्षअॅड. महेश मोहीते,गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सचीन करडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, हिंदू संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव पाटील, हिंदू समाज शहर अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांचा सहीत विविध मान्यवरांनी केंद्राचे दोनही कायद्याचे समर्थन केले.AM News Developed by Kalavati Technologies