गांधी कुटूंबाची एसपीजी सुरक्षा काढली, अशोक चव्हाण यांनी केला निषेध

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढणे अतिशय चूकीचे असून त्यांच्या जिविताला धोका असल्याचे चव्हाण म्हणाले

मुंबई । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गांधी कुटुंबातील एसपीजी संरक्षण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या उच्चस्तरीय सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर, आता नव्या यंत्रणेअंतर्गत गांधी कुटुंबाच्या सुरक्षा (सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा) यांना एसपीजीऐवजी सीआरपीएफ कमांडोजची झेड + सुरक्षा देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार हे सुरक्षा पथक त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या या निर्णाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढणे अतिशय चूकीचे असून त्यांच्या जिविताला धोका असल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच सरकारने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा असं ते म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies