औरंगाबाद कोरोनाचा चढता आलेख, आज जिल्ह्यात 126 जणांना कोरोनाची बाधा

जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचा वेग मंदावला होता, मात्र आता पुन्हा कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होतांना दिसत आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात मंदावला असून, आज जिल्ह्यात 126 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर एक जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 41 हजार 338 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध भागात 671 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 109 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आज 127 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे 39 हजार 558 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (106)

पडेगाव (3), देवानगरी (1), एन सहा सिडको (1), हर्सुल (2), जाधववाडी (1), भगतसिंग नगर (3), मल्हार चौक, गारखेडा परिसर (1), मंजुरपुरा, लोटाकारंजा (2), न्यू बालाजी नगर (1), हुसेन नगर (1), टिळक नगर (1), सौजन्य नगर (1), सावित्री नगर (1), साई नगर (1), रायगड नगर (1), शिवेश्वर कॉलनी (1), टेलिकॉम सो (1), पारिजात सो. बजाज नगर (1), साई परिसर (1), एसआरपीएफ कॅम्प परिसर (14), कांचनवाडी (1), नाथ पोदार सो. (2), घाटी परिसर (3), ज्योती नगर (1), भानुदास नगर (1), देशमुख नगर (1), बळीराम शाळा परिसर (1), भक्ती कंन्स्ट्रक्शन (1), केंब्रिज शाळा परिसर (1), राज नगर (1), केशरसिंगपुरा (2),कासलीवाल तारांगण (1), बीड बायपास (1), इटखेडा (1), एन सात सिडको (1), नारळीबाग परिसर (1), एन वन (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), जाधववाडी (1), व्यंकटेश नगर (1), एसबीएच कॉलनी (1), अन्य (41)

ग्रामीण (20)

शिवाजी नगर (1), बजाज नगर (3), जय जनार्दन सो., बजाज नगर (1), वैजापूर (1), गंगापूर (2), फुलंब्री (1), कन्नड (1), अन्य (10)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत चिकलठाणा परिसरातील 77 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



AM News Developed by Kalavati Technologies