गोध्रा हत्याकांड मॉबलिचिंग नव्हती का? ओवैसींचा मोहन भागवतांना सवाल

नागपूर येथील दसरा मेळाव्यात मोहन भागवत यांनी ‘मॉब लिंचिंग’ याविषयावर भाष्य केले होते.

जालना | देशात जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान आहे, तोपर्यंत भारताला कुणीही हिंदू राष्ट्र बनवू शकत नसल्याचा इशारा एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवतांना दिला आहे. जालन्यात एमआयएमचे उमेदवार एकबाल पाशा यांच्या प्रचारार्थ ओवैसी यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच गोध्रा हत्याकांड मॉब लिचिंग नव्हती का? असा सवालही औवेसिंनी मोहन भागवतांना विचारला आहे. नागपूर येथील दसरा मेळाव्यात बोलताना मोहन भागवतांनी मॉब लिचिंगवर भाष्य केले होते. याचसंदर्भात ओवैसींनी भागवतांवर निशाणा साधला आहे.

जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत भारताला कुणीही हिंदू राष्ट्र बनवू शकत नसल्याचं म्हणत ओवैसींवी मोहन भागवतांवर सडकून टीका केली. भारतावर दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्यापूर्वी देशात राजे-रजवाडे, मुघलांची सत्ता होती. या काळातल्या वर्णव्यवस्थेत लोकशाही कुठे होती असा सवालही ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना उद्देशून केला. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर मधील केलेल्या आपल्या भाषणात मॉब  लिचिंगचा संबंध हा भारताशी नसल्याचं वक्तव्य केलं होतं. गुजरातमधील गोध्रा घटना, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिख समाजावर झालेले हल्ले, हा मॉब लिचिंगचा प्रकार नव्हता का, असा सवालही ओवेसी यांनी मोहन भागवत यांना उपस्थित केलाय.

नागपूर येथील दसरा मेळाव्यात मोहन भागवत यांनी ‘मॉब लिंचिंग’ याविषयावर भाष्य केले होते. हा भारतीय शब्द नाही. विदेशी धर्मग्रंथातून हा शब्द आला असल्याचे ते म्हणाले होते. हा शब्द भारतात कसा रूढ झाला, हे शोधण्याची गरज आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्येसाठी ‘लिंचींग’ या शब्दाचा वापर करण्यामागे षड्यंत्र आहे. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे ते म्हणाले होते.AM News Developed by Kalavati Technologies