निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पप्पू यादवच्या कार्यकर्त्यांना चोपले

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 28 ऑक्टोबरपासून निवडणुकीला सुरूवात होणार आहे

पाटणा । बिहारमध्ये विधानसभेची तारीख आज निवडणुक आयोगाने जाहीर केली. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरू झाले. पप्पू यादव यांच्या जनअधिकार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटण्यात रस्त्यावर राडा केला. यादव यांच्या पोस्टराची गाडी पाटण्यातून जात असतांना रस्त्यातच भाजप आणि जनअधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर बाचाबाचीचं रुपांतर भांडण्यात झालं. या मारहाणीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी यादव यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला आहे. लोकांनी आणि पोलीसांना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सोडवले आहे.

दरम्यान, विधानसभेची तारीख जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये वातावरण पुर्णत: बदलले आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी येत्या 28 ऑक्टोबरपासून तीन टप्प्यात मतदान होणार आहे. देशात कोरोनाचा कहर कायम आहे आणि अशातच बिहार विधानसभा निवडणुक पार पाडली जात असल्याने, राज्य निवडणुक आयोगाला 6 लाख पीपीई किट वितरीत करण्यात येणार आहे. तर 46 लाखांहुन अधिक मास्क आणि सॉनिटाइजरचा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. तसेच पक्ष आणि कार्यकर्त्यांना व्हर्च्यु्ल पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे. तसेच उमेदवाराला सभा घेता येणार नसल्याचंही निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies