अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने केला पॅरोल मंजूर

सध्या तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे

नागपूर । अंडर वर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीच्या आजारी असल्याच्या कारणास्तव अरुण गवळी याने यापूर्वी नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. ज्यानंतर अरुण गवळीने पॅरोल करता नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. अरुण गवळी यापूर्वी संचित रजेवर बाहेर आल्यावर कुठलेही अनुचित कार्य केले नसल्याचे गवळीच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिल्यावर कोर्टाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला. शिवसेना आमदार कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्ये प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे.AM News Developed by Kalavati Technologies