शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरेंनी स्वीकारला पदभार

प्रथम साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेत डोंगरे यांनी संस्थानच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत साई मंदिर परिसराची पहाणी केली.

शिर्डी | शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून IAS अधिकारी अरुण डोंगरे यांनी आपला पदभार स्वीकारला. प्रथम साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेत डोंगरे यांनी संस्थानच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत साई मंदिर परिसराची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी आपला पदभार स्वीकारत, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. डोंगरे यांनी राज्य प्रशासनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, साई संस्थानवर रुजू होण्यापूर्वी ते नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना आता साई दरबारी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकिर्दीत साई संस्थानसह शिर्डीच्या विकासाची धोरणात्मक कामे होतील हीच सर्वसामान्य साईभक्तांची अपेक्षा आहे.AM News Developed by Kalavati Technologies