'पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो' म्हणणारे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह

पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना आता कोरोनाची लागण झाली असून; त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच कोरोनावर संजीवनी ठरणारी लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचेच लक्ष लागले आहे. अशाच कोरोनावर मात करण्यासाठी अनेक गावठी औषधसुद्धा समोर आले होते. आमुक खाल्ल्याने कोरोना बरा होतो. असे अनेक दावे आपण ऐकले आहे. अशातच एक दावा केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी केला होता. पापड खाल्ल्याने कोरोना कायमचा बरा होतो असे विधान त्यांनी केले होते. मात्र त्यांच्या ह्या कोरोनावरील पापड स्वत: त्यांच्याच आरोग्यासाठी लाभदायक ठरला नाही. मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies