चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 96 हजार जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात पुन्हा विक्रमी रुग्णांची भर पडली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर लगातार सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 45 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 76 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 35 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 96 हजार 551 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे तर 1 हजार 209 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 45 लाख 62 हजार 415 एवढा झाला आहे. तर 76 हजार 271 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब ही की आतापर्यंत सुमारे 35 लाख 42 हजार 664 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूनं जगभरातील सुमारे 200 देशामध्ये धुमाकूळ घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 कोटी 80 लाखांच्या पार गेला आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान, 9 लाख जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सुमारे 1 कोटी 90 लाख जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याचा जर आपण विचार केला तर अमेरिका अव्वल क्रमाकांवर असून, भारत दुसऱ्या क्रमाकांवर आहे.



AM News Developed by Kalavati Technologies