चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 लाखांच्या पार

देशात कोरोनाता प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोजच हजारोंच्या संख्येने वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 47 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 78 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 37 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात पुन्हा 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 47 लाख 54 हजार 357 एवढा झाला आहे. तर उपचारादरम्यान, आत्तापर्यंत सुमारे 78 हजार 586 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे, 37 लाख 2 हजार 596 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिलासादायक म्हणजे रुग्ण बरे होण्याचा प्रमाण सुद्धा मोठया प्रमाणात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात फक्त 50 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मात्र आता देशभरात 36 लाख रुग्णांनी कोरोनावरती यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाच्या जगभरातील आकडेवारीचा जर आपण विचार केला तर, अमेरिका हा अव्वल क्रमाकांवर असून, त्यापाठोपाठ भारत आहे.AM News Developed by Kalavati Technologies