दहशतवाद विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधीत गुंडाच्या मुसक्या आवळल्या

मानसींग पाटील यांनी सहका-यांसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतले

पालघर । पालघर दहशतवाद विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीशी सबंधीत अख्तर कासब अली मर्चंट ( वय 56) या कुख्तात गुंडाला नालासोपाऱ्यात पकडण्यात यश आले आहे. अख्तर मर्चंट हा दाऊद इब्राहिम टोळीशी संलग्न असून त्याच्यावर मूंबई, गुजरात येथील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबईत त्याने स्वत:ची गॅग तयार केली होती. तसेच तो खंडणी गोळा करणे, अपहरण करून पैसे उकळणे तसेच ड्रग्ज माफीयाशी त्याचे संबंध होते. ठाणे ग्रामीण, मिरारोड, नागपाडा, मूंबई, वसई-विरार-नालासोपारा भागात त्याने दहशत माजवली होती. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, डिसेंबर 2018 पासून तो नेपाळ, बांग्लादेश येथे लपून राहिला होता. बांग्लादेश येथून नैरोबो येथे पासपोर्ट बनवून जाण्याच्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरल्यावर परत मूंबईत आला होता. 25 फेब्रुवारी रोजी तो नालासोपारा पश्चिम येथे येणार असल्याची खबर मिळाल्यावर पालघर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमूख मानसींग पाटील यांनी सहका-यांसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे.AM News Developed by Kalavati Technologies