Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात आणखी तीन नव्या रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 497 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात मंदावला असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहे. आज सकाळी जिल्ह्यात 58 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश होता.

आज दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात जिल्ह्यात तीन नव्या रुग्णांची भर पडली असून यादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत रुग्णांमध्ये फुलंब्रीच्या वडोद बाजार येथील 53 वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील जामा मस्जिद परिसरातील 61 वर्षीय महिला, शहरातील छावणी येथील 67 वर्षीय पुरुष, एन सहा संभाजी कॉलनीतील 50 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तर नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन रुग्णांमध्ये सिल्लोड तालुक्यातील निल्लोड गावातील एक रुग्ण तर मनपा हद्दीतील क्रांती नगर आणि शांतीपुरा छावणी मधील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 15 हजार 211 इतकी झाली असून यापैकी 11 हजार 368 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत 497 रुग्णांचा उपचार जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15211 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 497 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies