Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी चार रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात दुपारच्या सत्रात चार रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला आहे. जिल्ह्यात आज दुपारी चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 14 हजार 644 एवढी झाली आहे. त्यापैकी 10 हजार 901 बरे झाले तर 486 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3257 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

*मनपा (03)*

क्रांती नगर (1), खडकेश्वर (1), बन्सीलाल नगर (1)

*ग्रामीण (01)*

खतगाव, पैठण

*दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू*

घाटीत न्यू हनुमान नगरातील 65 वर्षीय, शहानूरमिया दर्गा परिसरातील कृष्णा नगरातील 45 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



AM News Developed by Kalavati Technologies