नागपूरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण, बाधितांची संख्या 5 वर

सदरील व्यक्ती हा दिल्लीवरून नागपूरला आला होता, तो कोरोना बाधित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे

नागपूर | नागपूरात एका 42 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला आहे. सदरील व्यक्ती हा दिल्लीहून आला असल्याची माहिती आहे. दिल्लीवरून आलेल्या या संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा आज अहवाल आला आहे. दरम्यान अहवालात सदरील व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. यानंतर या व्यक्तीला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपूरात या संशयित व्यक्तीच्या अहवालानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies