तेलंगणात पुन्हा महिलेचा जळालेला मृतदेह आढळला, 48 तासांत घडलेली दुसरी घटना

अवघ्या 48 तासांच्या आत दुसऱ्या महिलेचा जळालेला मृतदेह आढळल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

तेलंगणा । सिदुला गुट्टा मंदिर परिसरात शुक्रवारी महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. हा परिसर आरजीआय विमानतळ पोलिस स्टेशन अंतर्गत येतो. डीसीपी प्रकाश रेड्डी यांच्या मते, मंदिराजवळ एका महिलेचा मृतदेह जळत असल्याची माहिती स्थानिकांना पोलिसांना मिळाली होती. लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला मृत झाली होती.  पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय साधारणत: 3० ते 35 असून अद्याप ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डीसीपी रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेने स्वत:ला पेटवून घेतले की एखाद्याने तिची हत्या केली हे अद्याप निश्चित झालेले नाही. या घटनेच्या तपासासाठी अनेक पथके कार्यरत झाली आहेत. दरम्यान, अवघ्या 48 तासांच्या आत दुसऱ्या महिलेचा जळालेला मृतदेह आढळल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कार जाळून हत्या, हैदराबादमधील धक्कादायक घटना

पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या
रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर भागात बुधवारी पशुवैद्यकीय डॉक्टर महिला बेपत्ता झाली होती. बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत या डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. यानंतर मृतदेह 30 किमी दूर नेऊन जाळण्यात आला. शुक्रवारी हे प्रकरण उजेडात आल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी चार संशयितांना अटकही करण्यात आली आहे. आरोपी हे ट्रकचालक आणि क्लीनर आहेत. मृत डॉक्टर महिलेची गाडी पंक्चर झाल्यानंतर तिने सर्वात आधी बहिणीला फोन लावला होता. बहिणीने तिला कॅब करण्याचा सल्ला दिला. परंतु तितक्यात काही अनोळखी व्यक्तींनी तेथे येऊन डॉक्टर महिलेला मदत करण्याचे सांगितले. यामुळे फोनवरच डॉक्टर महिलेने आपल्या बहिणीला काही जण मदतीला आले असल्याचे सांगून फोन ठेवला. तेव्हापासून डॉक्टर महिलेचा फोन बंद होता. अखेर शुक्रवारी त्या महिलेवर बलात्कार करून तिचा मृतदेह जाळल्याचे समोर आले.AM News Developed by Kalavati Technologies