नवी मुंबईत आणखी 78 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, दिवसभरात दोन जणांचा मृत्यू

नवी मुंबईत आज दिवसभरात 78 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

नवी मुंबई | आज दिवसभरात 78 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सदरील रुग्णांमध्ये बेलापूरमधील 7 रुग्ण, नेरुळमधील 12 रुग्ण, वाशीमधील 9 रुग्ण, तुर्भेमधील 21 रुग्ण, कोपरखैरणे येथील 11 रुग्ण, घणसोलीतील 12 रुग्ण, ऐरोलीमधील 6 रुग्ण, आणि दिघामधील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच आज कोरोनाने 2 जणांचा बळी घेतला असल्यानं कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 61 वर पोहचली आहे. आतापर्यंत नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 931 वर पोहचली असून यातील 881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies