परभणीत गेल्या 24 तासात 54 कोरोनाबाधितांची नोंद, 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

परभणी | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 54 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर याचदरम्यान 5 जणांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे़ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 818 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 411 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 359 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies