जालन्यात कोरोनाचा विस्फोट, आणखी 25 नवे रुग्ण आढळले, एकूण संख्या 800 पार

जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे.

जालना | जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे. आज सकाळी एकाच वेळी आढळून आलेल्या 56 रुग्णांनंतर दुपारी आणखी नवे 25 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 800 च्या घरात पोहोचलाय. जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बन्सीपुरा भागातील 8 रुग्ण, काद्राबाद 3 रुग्ण आणि संभाजीनगर, मोंढा नाका, मंगळबाजारमध्ये प्रत्येकी 2 - 2 रुग्ण तर कमानगल्ली, नया बाजार, सहयोग नगर, झाशी राणी चौक, सकलेचा नगर, चौराईपुरा, जेईएस कॉलेज रोड आणि अंबड रोडवरील श्रीनगरमध्ये प्रत्येकी 1 - 1 रुग्ण आढळून आला आहे.

सकाळपासून जालन्यात 81 नवे रुग्ण सापडले असून त्यात जालना शहरातील तब्बल 72 रुग्ण आहेत. दरम्यान आजच्या या रुग्ण वाढीमुळं जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही 800 वर जावून पोहोचली आहे. दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णांमुळं प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.AM News Developed by Kalavati Technologies