बुलडाण्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात परत 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे

बुलडाणा | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी उद्या म्हणजे 7 जुलै पासून 21 जुलै पर्यंत पंधरा दिवस जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 300 वर जाऊन पोहचल्याने, ही वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलली जात आहे. त्यानुसार आता 21 जुलै पर्यंत सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने सर्व नियमांचे पालन करून सुरू राहतील तर इतर वेळेत जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. सोबतच प्रशासनाकडून घालून दिलेले निर्बंध तसेच सूचनांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.

मास्कचा वापर हा बंधनकारक करण्यात आला आहे. जो कुणी व्यक्ती मास्कविना आढळल्यास त्यावर 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.AM News Developed by Kalavati Technologies