भव्य राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त परभणीत आनंदोत्सव साजरा

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने भजन तर भाजपच्या वतीने पेढे वाटप

परभणी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. यानिमित्ताने परभणी शहरासह जिल्हाभरात राम भक्तांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. परभणी येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने घरोघरी भजन, राम रक्षा, राम स्तोत्राचे वाचन करत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. याच नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद देत महिला व नागरिकांनी सहभाग नोंदविला. तर भाजपच्या वतीने महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी बाजारपेठेत व्यापार्‍यांना व नागरिकांना पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

परभणी शहरातील नागरिकांनी ही आपल्या घरातच सोशल डिस्टंसिंग ठेवत मोठ्या उत्साहाने हा सोहळा पार पडला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता मात्र नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत आपल्या घरीच हा सोहळा मोठ्या आनंदाने पार पाडला.

भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी 1990 व 92 साली झालेल्या कार सेवेमध्ये परभणी जिल्ह्यातील सहभागी झालेल्या कार सेवकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात परभणी जिल्ह्यातही भूमिपूजन सोहळा पार पडला.AM News Developed by Kalavati Technologies