VIRUL : या रिक्षाला पाहुन महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राही झाले फिदा

या अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी केला शेअर

मुंबई । सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. तो म्हणजे मुंबईतील अनोख्या रिक्षाचा. रिक्षामध्ये केलेल्या जुगाडाचं सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन वाचण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम सुविधा पुरविण्यासाठी अशा प्रकारे भन्नाट रिक्षा रिनोव्हेट केली आहे. या रिक्षामध्ये हात धुण्यासाठी सॉनिटायझर, पिण्यासाठी पाणी, हात धुण्यासाठी बेसिंग, कचरा टाकण्यासाठी डस्टबिन तसेच झाडांची रोप असलेल्या कुंड्या सुद्धा ठेवण्यात आल्या आहे. इतकचं नाही तर, मोबाईल इंटरनेटसाठी वाईफाई सुद्धा बसवण्यात आले आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असुन, त्यांनी कॅप्शन लिहीले आहे की, रिक्षा चालकाने स्वच्छ भारतची जाहीरात केली आहे. हा ऑटो आर्थिक राजधानी मुंबईतील आहे. हे स्पष्ट करा की, कोरोनाला आळा घालण्यासाठी वारंवार हातधुणे, स्वच्छता राखणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचा पालन करणे महत्वाचे आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies