औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची वाढ, एकूण संख्या 1487 वर

तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. संध्या 481 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आजही 28 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 1487 वर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यातील 937 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. संध्या 481 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 10 महिला रुग्णांचा समावेशी आहे.AM News Developed by Kalavati Technologies