एरंडा शेतशिवारात आढळला 8 फुटांचा महाकाय अजगर

सर्प मित्र तुषार आवारे यांनी कुठलीही इजा होऊ न देता पकडले व सुखरूप वनविभागाच्या स्वाधीन केले

अकोला । एरंडा शेतशिवारात शेत मजूर काम करीत असताना 7 ते 8 फूट लांब अजगर आढळून आला. सर्प मित्र तुषार आवारे यांनी कुठलीही इजा होऊ न देता पकडले व सुखरूप वनविभागाच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यास जंगलात सोडण्यात आले.

पावसाळा सरला असुन वातावरणात उष्मा वाढला आहे. त्यामूळे साप आणि इतर सरपटणारे थंडाव्यासाठी व प्रामुख्याने शिकारीसाठी मानवी वस्ती, गोदामे व पोल्ट्री फार्म आदि ठिकाणी सर्रास आढळतात. प्रभाकर अप्पा गवळी यांचा शेतात शेतमजूर काम करीत असतांना बाजूलाच असलेल्या नाल्या जवळ त्यांना हा अजगर आढळताच एकच धावपळ उडाली, शेतकर्यांनी लागलीच या संदर्भात सर्प मित्र तुषार आवारे यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळ गाठून अजगराला पकडले. सर्पमित्रांनी या अजगराला पकडून अकोला वन विभागाच्या स्वाधीन केले आहे. वन विभागाने अजगराचा रीतसर पंचनामा करून त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies