'राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीसांना आवरा'

राज्यात पुन्हा भाजप-सेनेचे सरकार येईल असे भैय्याजी जोशी म्हणाले होते, परंतु...

नागपूर । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेनेच्या ट्विटर वादात आता शेतकरी नेते व वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उडी घेतली आहे. किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांना आवरा असे या पत्रात नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा भाजप-सेनेचे सरकार येईल असे भैय्याजी जोशी म्हणाले होते. परंतु, वस्तुस्थिती ही वेगळी असल्याचे किशोर तिवारींनी या पत्रात म्हटले आहे. भारतीय राजकारणातील अनेक नेत्यांच्या पत्नी किंवा पती यापूर्वी अशाप्रकारे उतरल्या नाहीत, अमृता फडणवीस यांची राजकारणातील सक्रियता ही अवाजवी असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे. यासाठी तिवारी यांनी भारतीय राजकारणातील अनेक मोठ्या नेत्यांची उदाहरणे दिली. (बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गवासी मीनाताई ठाकरे, सुषमा स्वराज यांचे पती, अमित शाह यांच्या पत्नी, अडवाणी यांची पत्नी ते नरेंद्र मोदी यांच्या पत्नीचाही दाखला दिला).AM News Developed by Kalavati Technologies