खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपुरात दाखल

नवनीत राणा यांच्यावर 6 दिवसांपासून कोरोना उपचार सुरू आहेत.

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची तब्बेत बिघडली असल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपुर्वी नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला.

राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.AM News Developed by Kalavati Technologies