अमरावती कापसाच्या गाडीला आग, आगीत 7 क्विंटल कापुस जळून खाक

टेम्पोमधून आणलेल्या कापसाला अचानक आग लागली, आगीत 7 क्विंटल कापुस जळुन खाक झाला

अमरावती | शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कापसाला अचानक आग लागल्याने आगीत 7 क्विंटल कापुस जळुन खाक झाला आहे. ही दुर्देवी घटना लेहगाव येथे घडली आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने भिवापूर येथील शेतकऱ्याने लेहगाव  जिनिंग मध्ये कापूस विक्रीकरिता आणला होता. टेम्पोमधून आणलेल्या या कापसाला अचानक आग लागल्याने या आगीत 7 क्विंटल कापुस जळुन खाक झाला आहे. या घटनेनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अगोदरच चीनमध्ये मोठ्या प्रमाणत होणारी कापसाची निर्यात कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाली आहे. परिमाणी कापसाची निर्यात होत नसल्याने कापसाला बाजारभाव कमी मिळत आहेत. त्यात अशा घटना घडल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या आगीनं हिरावून घेतला आहे.AM News Developed by Kalavati Technologies