अमरावती | कलाशिक्षक अरविंद दहापूते तिहेरी पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल त्रिलोचन सन्मान -२०१९, जगन्नाथ दास रत्नाकर सन्मान-२०१९ आणि ज़फर अवार्ड-२०१९ या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले

वर्धा | कलाशिक्षकांना शैक्षणिक, सामाजिक तसेच कलेच्या क्षेत्रात राज्यस्तराप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देण्यात येतात. नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील संजय गांधी स्मृती विद्या मंदिर शाळेचे कलाशिक्षक अरविंद दहापूते यांना तिहेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्ध हिंदी गीतकार, कवी व गांधीवादी जयसिंग आर्य यांच्या हस्ते अरविंद दहापुते यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल त्रिलोचन सन्मान -२०१९", "जगन्नाथ दास रत्नाकर सन्मान-२०१९" व "ज़फर अवार्ड-२०१९" या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नवोदित साहित्यकार मंच व सोसायटी फॉर युथ डेव्हलपमेंट' आणि 'गांधी शांती प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies