बलात्कारातील आरोपीला त्वरित फाशी द्या, चिमुकलीच्या आई-वडिलांची मागणी

आरोपीची न्यायालयीन चौकशी करण्यात सुरू आहे.

अमरावती | जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील गायवाडी येथे तीन जानेवारी रोजी आपल्या काकाने सात वर्षीय चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीची न्यायालयीन चौकशी करण्यात सुरू आहे. मात्र या आरोपींना त्वरित फाशी देण्यासाठी विविध संघटना विद्यार्थी संघटना आता रस्त्यावर उतरले आहे.

परंतु आरोपीचे नातेवाईक मुलीच्या आई-वडिलांना धमकी देत आहे. जर तुम्ही आमच्याविरुद्ध मोर्चे काढाल तर तुम्हाला हातपाय तोडून ठेवण्यात येईल. अशा धमक्या सुद्धा आरोपी दीपक जामनिक याचे नातेवाईक करीत असल्याचा आरोप चिमुकलीच्या आईने केला आहे. यासंदर्भात काल चिमुकली सह तिचे आई-वडील व ग्रामस्थ उपविभागीय कार्यालय दर्यापूर येथे आरोपीला चोरीत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी प्रशासनाला करण्यात आली. मात्र आता प्रशासन आरोपींच्या मागे उभे राहील की एका सात वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हे पाहणे आता योग्य ठरेल.AM News Developed by Kalavati Technologies