पुण्यातील दारूगोळा कारखान्याचे कर्मचारी आजपासून एक महिन्याच्या संपावर

देशभरातल्या 41 दारूगोळा फॅक्टरीचे 82 हजार कर्मचारी आज संपावर आहेत.

पुणे | येथील तिन्ही दारूगोळा कारखान्यांचे कर्मचारी आजपासून एक महिन्याच्या मोठ्या संपावर जाणार आहेत. दारूगोळा कारखान्यांच्या खाजगीकरणाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. ऑडनस फॅक्टरी खाजगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज पासून सुरू होतेय. महाराष्ट्रातील दहा ऑडनस फॅक्टरी मधील 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी जाणार संपावर आहेत. तर देशभरातल्या 41 दारूगोळा फॅक्टरीचे 82 हजार कर्मचारी आज संपावर आहेत.

भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये खाजगी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील 10 ऑडनस फॅक्टरी मधील सुमारे पन्नास हजारापेक्षा जास्त कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगार महिन्याभराच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ युनियन आणि संलग्न संस्थांनी 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान 30 दिवसाचा संप पुकारला आहे. संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मंजुरी मिळाली असल्याने तसेच भारतीय ऑडनस फॅक्टरी मध्ये उत्पादित होणाऱ्या 143 उत्पादने खाजगी कंपनीला उत्पादित करण्याची मंजुरी केंद्र सरकारकडून मिळाली आहे.

यामधील पुढचा टप्पा म्हणजे खाजगीकरण आहे. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी मधील कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा निर्णय घेताना ऑडनस फॅक्ट्रीचे कामगार प्रबंधन संघटना व कर्मचारी यांना शासनाने विश्वासात न घेता हा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार आंदोलकनेत्यांनी दिली. खाजगीकरणाच्या विरोधात देहूरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मधील जवळपास 1 हजार कामगारांनी मानवी साखळी तयार करत मुंबई पुणे महामार्गावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, निदर्शने करून आंदोलन केले. आजपासून ऑडनस फॅक्ट्री कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies