बिग बींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

दोन जुनी सुंदर अशी फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई | बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. त्यांनी यासोबत दोन जुनी छायाचित्रे शेअर केली आहेत. पहिल्या छायाचित्रामध्ये ते त्यांची लेक श्वेता नंदासोबत दिसत आहेत. तिच्या बालपणीचा हा फोटो आहे. फुलबाजा उडवताना ते दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत फुलबाजा उडवताना देत दिसत आहेत. या फोटोमध्ये फुलबाजा उडवताना जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांचा हात पकडलेला आहे.

ही दोन जुनी सुंदर अशी फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी लिहिले की, 'दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. सुख, शांती, समृद्धी सदा' यानंतर त्यांनी आपल्या या शुभेच्छांचा स्वीकार करण्याची विनंती अमिताभ यांनी केली आहे. आपण दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद म्हणून कृपया या शुभेच्छांचा स्वीकार करावा. माझ्यासाठी वयक्तिकरित्या प्रत्येकाला उत्तर देणे माझ्यासाठी शक्य नाही, अशा शब्दात अमिताभ यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बीग बी अमिताभ बच्चन हे बॉलिवूडप्रमाणेच सोशल मीडियावरही तेवढेच सक्रिय असतात. चित्रपटाची किंवा एखाद्या अभिनेता, अभिनेत्रीची प्रशंसा करण्यासाठी, किंवा शुभेच्छा देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. या वेळी देखील अमिताभ बच्चन यांनी तत्परतेने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी आपला 77 वा वाढदिवस साजरा केला होता. ते आपल्या घरी दिवाळी पार्टी आयोजित करतील अशाही चर्चा आहेत. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज सहभागी होऊ शकतात.AM News Developed by Kalavati Technologies