कोल्हापूर | लॉकडाऊनमध्ये 50 कोटींचं नुकसान; हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, व्यावसायिकांची मागणी

लग्नसराईचा सिझन देखील गेल्यामुळे हॉटेल व्यवसायिक पुन्हा कसं उभं राहायचं असा प्रश्न व्यावसायिकांना पडत आहे.

कोल्हापूर | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाउनचा फटका अनेकांना बसत आहे. कोल्हापूरातील हॉटेल व्यवसायिकांना देखील या लॉकडाऊनमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळं जिल्ह्यातील जवळपास दीडशेपेक्षा अधिक हॉटेल व्यावसायिकांचं सुमारे पन्नास कोटी पेक्षा अधिक नुकसान झालं आहे. लॉकडाऊन 4.0 मध्ये नॉन रेड झोन मधील व्यवसायांना काही अंशी शिथिलता मिळाली असली तरी देखील कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायिकांना मात्र अद्याप व्यवसाय करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे पेक्षा हॉटेल व्यावसायिकांचा 50 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले असून हॉटेल व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी केली आहे. कोरोना बरोबरच सध्या पर्यटन हंगाम आणि लग्नसराईचा सिझन देखील गेल्यामुळे हॉटेल व्यवसायिक पुन्हा कसं उभं राहायचं या चिंतेत व्यथित झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies