सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल - माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

14 ऑगस्टपर्यंत डोंबिवलीमध्ये सरसकट दुकाने उघडी करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे

कल्याण । कोरोना काळात गेल्या मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकानदारांची आर्थिक स्थिती ढासळत चालली असून, त्यामुळे दुकाने सुरू करण्याची मागणी डोंबिवली ग्रेन्स एण्ड प्रॉव्हिजन मर्चंट्स असोसिएशने केली असून त्यासंदर्भात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीला माजी राज्य मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत दुकानदारांनी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद केली होती. आम्ही सरकारला सहकार्य केले मात्र त्यानंतर मिशन बिगेन अंतर्गत काही अटी शर्तींवर सकाळी 9 ते 5 या वेळात सम-विषम तारखांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विक्रेत्यांना एक दिवसाआड दुकाने उघडावी लागत आहेत.

सततच्या लॉकडाऊनच्या नियमांमुळे दुकाने बंद असल्याने दुकानदारांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. आता पुढील काळ सणाचा असल्यामुळे या काळात सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रेन्स एण्ड प्रॉव्हिजन मर्चंट्स असोसिएशने केली आहे. याबाबत माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी राज्य शासनाने सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, प्रशासनाने आखून दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमाचे सर्व व्यापारी देखील पालन करतील. येत्या 14 तारखेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा त्यानंतर दुकानदारांसह भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा राज्य सरकारला दिला.AM News Developed by Kalavati Technologies