मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधी टीका केली नाही - सुधीर मुनगंटीवार

समझोता करत मुंबई महापालिकेत आम्ही कुठलेही पद घेतले नाही - सुधीर मुनगंटीवार

मुंबई । भाजपवर शिवसेनेने लावलेला आरोप आम्ही खारीज करतो. नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है, असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा अस मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणतीही चर्चा न करता आम्हाला इतर पर्याय खुले आहेत. ही घोषणा सेनेने केली होती. तसेच भाजपला खोटे ठरवण्या अगोदर विचार करायला हवा होता. मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधी टीका केली नाही, आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी होता. असा पलटवार देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

राम मंदिर आमच्यासाठी महत्वाचे आहे. समझोता करत मुंबई महापालिकेत आम्ही कुठलेही पद घेतले नाही. आम्हाला विकासाचे उन्नतीचे कार्य करायचे आहे. राम मंदिरासाठी आम्ही सत्ता सोडली होती. आम्ही आमचं नातं तुटलं असे मनात नाही असही यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस झाले आहेत. अद्यापही सत्तास्थाप झाली नाही. त्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला गेला होता. भाजप विरोधी पक्षांचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे असा आरोपही त्यांनी केला होता. भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप त्यांनी पुढील 48 तासांत सिद्ध करावे असे आव्हान मुनगंटीवार यांनी दिले आहे. तसेच हे आरोप त्यांना सिद्ध करता येत नसतील तर त्यांनी जाहीर माफी मागावी असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies