बिलोलीत CAA व NRC कायद्या विरोधात सर्व पक्षीय आंदोलन

तालूक्यातील सर्व धर्मीय व सर्व पक्षीयांच्या वतीने CAA व NRC विरोधात भव्य मोर्चा

नांदेड । केंद्र शासनाकडून सीएए व एनआरसी या दोन कायद्याच्या अंमलबजावणीने लाखो नागरिक धास्तावले असून अनेकांनी जनअंदोलन उभे करुन रस्त्यावर ऊतरले व आपले जिव गमावले आहे. याचा विरोध म्हणून बिलोली तालूक्यातील सर्व धर्मीय व सर्व पक्षीयच्या वतीने CAA व NRC विरोधात भव्य मोर्चा शहरातील गांधी चौक पासून ते तहसिल कार्यालया पर्यंत हजारोच्या संख्येने नागरीक ,युवकांचा सहभाग होता हा मोर्चा जुना बसटँन्ड मार्ग काढून तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मुस्लिम समाजाचे मौलाना व सर्व पक्षीय व सामाजिक नेत्यांनी हा कायदा देशातील नागरीकांच्या हिताचा नसून विरोधी आहे, हा कायदा रद्द होई पर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे आपल्या भाषणा दरम्यान बोलत होते. या नंतर निवेदना द्वारे प्रशासनाकडे आपल्या भावना कळविल्या आहे.AM News Developed by Kalavati Technologies