संघ-शिवसेना-भगवानगडावरील मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष

ऐन विधानसभा निवडणूक प्रचार काळात यंदाचा मेळावा

विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा तर भगवानगडावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. हे तिन्ही महत्त्वाचे मेळावे आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भगवानगडावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा नेमका काय राजकीय संदेश देणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच हे मेळावे होणार असल्याने विजयाचा संकल्प करणाराचे मेळावे आज पाहायला मिळणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर कोणती तोफ डागणार, राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार याकडे प्रसार माध्यमांचे आणि राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

ऐन विधानसभा निवडणूक प्रचार काळात यंदाचा मेळावा साजरा होणार असल्याने लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक ‘शस्त्रपूजना’कडे आणि उद्धव ठाकरे उद्या निवडणुकीतील विजयाचा कोणता मंत्र देतात याकडेच लागले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरांचा वारसाच होय. राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आवर्जून या मेळाव्यासाठी शिवतीर्थावर अलोट गर्दी करतात आणि विचारांचे सोने लुटतात. त्यातूनच राज्याच्या, देशाच्या राजकारणाला दिशा मिळते.AM News Developed by Kalavati Technologies