हुंडाबळी! नवविवाहितेला आधी मारले, नंतर लटकविले फासावर, पतीसह सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात

हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या केल्याची संतापजनक अकोला शहरातील गुलवाडे प्लॉटमध्ये घडली आहे.

अकोला | लग्नात हुंडा कमी मिळाला म्हणून माहेरहून पैसे आण, असा तगादा लावणाऱ्या पतीसह सासऱ्याला पैशाचा नकार दिल्यानं एका नवविवाहितेची हत्या केल्याची संतापजनक अकोला शहरातील गुलवाडे प्लॉटमध्ये घडली आहे. सुमय्या परवीन शेख इमरान असं या हत्या करण्यात आलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी सुमय्याचा पती इमरान, सासरा शेख जब्बार आणि सासू रजिया बी शेख जब्बार हिला जूने शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुमय्याचा 1 जानेवारी 2020 ला इमरानशी विवाह झाला होता.

मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून तिचा हूंड्यासाठी छळ सुरू होता. रविवारी मध्यरात्री पती, सासरा आणि सासूच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता. मात्र, सासरच्यांनी तिनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला आणि मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी सदरील प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सासू-सासरे आणि पतीने केलेल्या हत्येचं बिग फुटलं, याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies