अकोल्यात आणखी 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 362 वर

अॅक्टिव्ह रुग्णांची सख्या 128 वर गेली आहे.

अकोला | अकोल्यात आणखी 7 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 362 वर गेली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची सख्या 128 वर गेली आहे. दरम्यान, काल रात्री 5 जण कोरोना आजारातून पूर्णता बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्णांपैकी सहा महिला व एक पुरुष असून त्यात पाच जण फिरदोस कॉलनी येथील रहिवासी असून उर्वरित एक माणिक टॉकीज जवळ टिळकरोड तर अन्य लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. काल रात्री पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील तर अन्य फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फ़ैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.

अकोल्यातील कोरोना रूग्णांची सध्यस्थिती :
एकूण रूग्ण : 262
रोगमुक्त होऊन सुटी झालेले : 211
मृत्यू : 22
आत्महत्या : 01
सध्या उपचार सुरू असलेले : 128AM News Developed by Kalavati Technologies