अखिलेश यादव यांना मोठा झटका, झेड प्लस सुरक्षा काढणार

अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा विचार सरकार करत आहे. म्हणजे ब्लॅक कॅट कमांडो आता अखिलेश यादव यांच्या सुरक्षेत तैनात असणार नाही. अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासोबतच एनएसजीला यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या सुरक्षेतेसाठी एनएसजी तैनात असणार आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये अखिलेश यादव यांना मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर त्यांची सुरक्षा कमी करण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीला लोकसभेमध्ये 10 तर समाजवादी पार्टीला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर त्यांची युती तुटली. त्यामुळे अखिलेश यादव यांना दुसरा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

यापूर्वी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली होती. चंद्रबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली होती. यापूर्वी त्यांच्याजवळ 'झेड' श्रेणीची सुरक्षा होती. ती कमी करत 'वाय' सुरक्षा त्यांना देण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांना 2003 मध्ये तिरुपती येथील अलिपिरीमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.AM News Developed by Kalavati Technologies