अजित पवारांचं राज ठाकरेंबद्दल धक्कादायक विधान, म्हणाले - ईडी चौकशीनंतर...

अजित पवारांनी विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना टोला लगावला

बारामती । ईडीने साडेआठ तास चौकशी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती. मात्र या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना टोला लगावला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पण सरकारने कितीही चौकशा लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले आहेत, असं म्हणून खळबळ उडवून दिली आहे.

हर्षवर्धन पाटलांचा भाजप, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले -...AM News Developed by Kalavati Technologies