बच्चन कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या-आराध्या यांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अभिनेते अभिषेक बच्चन या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची कन्या आराध्या बच्चन यांचे देखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:- मोठी बातमी ! बच्चन पिता-पुत्रांना कोरोना, अमिताभ यांनी स्वत: ट्विट करत दिली माहिती

बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबत रात्री उशिरा माहिती दिली होती.

हे पण वाचा:- बच्चन कुटुंबानंतर अनुपम खेरच्या घरातही कोरोनाचा शिरकाव

हे सुद्धा वाचा:- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून बीएमसीकडून बंगला सील

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies