एनसीआरमधील प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी

बुधवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 467 पर्यंत वाढला.

नवी दिल्ली | दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. आता ही हवा विषारी होत आहे. बुधवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 467 पर्यंत वाढला. यामुळे वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणामध्ये धुकंसदृष प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्लीत हवेच्या प्रदुषणात आणखी वाढ झाली. यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

GRAPने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून हवेतील प्रदुषणाचा स्तर 2.5 (पीएम) पर्यंत गेला होता. दिल्लीमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक हा मंगळवारी 425 एवढा होता. यासोबतच देशातील सर्वात प्रदुषित जिल्हा पानिपतमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 436 असल्याचे नोंद करण्यात आले. तर गाजियाबादमध्ये 453, ग्रेटर नोएडामध्ये 436, फरीदाबाद 406, गुरुग्राम 402, मानेसर 410 आणि नोएडामध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 440 एवढा होता. यासोबतच दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते. यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले. तर, केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थांकडून हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला होता.

पंजाब, हरयाणामध्ये पराली जाळण्यावर बंदी असतानाही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पराली जाळत असतात. सरकारकडून आधुनिक पद्धतीने पराली जाळण्यासाठी 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. यासोबतच यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र दरवर्षी त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. दिल्ली-एनसीआरमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies