एम्सने सुशांत प्रकरणाची कोणतीही अधिकृत माहिती राज्य सरकारला दिली नाही - गृहमंत्री अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूत हत्या की आत्महत्या, याबाबत एम्सने कुठलीही अधिकृत माहिती राज्य सरकारला दिली नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले

नागपूर । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयाने असा दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

'सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात, एम्सच्या डॉक्टरांनी आतापर्यंत राज्य सरकारला कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.' असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. दरम्यान, एम्सच्या फॉरेन्सिक तपासात सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात खून झाला नसल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती आली नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies